पुस्तक पेढ़ी BOOK BANK

Student Application

पहिल्यांदा फॉर्म येथे भरावा
Please submit form first
Click Here


  • फॉर्म भरल्यानंतर एकूण ४ डॉक्युमेंट्स bookbank@siddhivinayak.org ह्या ई-मेल आयडी वर पाठवावे


Student Application Status
- New Applications NOT Accepted
- Books Distribution as per availability in stock

१. इयत्ता ११ वी व १२ वी च्या वर्गात १३ वी ते १५ वी च्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांचे संच प्रमाणानुसार वर्षातून दोन वेळा पुरविले जातात. इयत्ता १३ वी ते १५ वी च्या विद्यार्थ्यांकडून पहिला संच घेतल्यानंतर दुसऱ्या सत्राची पुस्तकं दिली जातात. दुसऱ्या सत्राची पुस्तकं घेण्याच्या अटींचे पालन केलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या संचाचे वितरण करण्यात येते.

२. इयत्ता ११ वी ते १५ वी च्या विद्यार्थ्यांकडून न्यायाच्या संकोतिक स्वरूपाकडून उर्वरित नोंदी ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी दि. ९ जून २०२५ पासून ते ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत करता येतील. पात्र विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात येईल. दि. ०१ सप्टेंबर २०१६ पासून न्यायाच्या संकीतिक स्थळावर नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

३. संस्था व महाविद्यालयाचे अर्ज १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. दि. ०१ ऑक्टोबर नंतर संस्थेकडून / महाविद्यालय यांचेकडून पुस्तक मिळवण्यासाठी पाठविण्यात आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत.

४. संस्था व महाविद्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्ताव पुस्तकपेढी योजनेंतर्गत न्यास उपसमितीने मान्य केल्यानंतर संस्था व महाविद्यालयांना पुस्तक उपलब्ध करून देण्यात येतात. पुस्तकें पुनर्वाटारकडून न्यासास प्राप्त झाल्यानंतर पुस्तकपेढी विभागातून कार्यक्रम आयोजित करून पुस्तकांचे वितरण करण्यात यावे अशी सूचना मा. अध्यक्षांनी केली आहे. त्यानुसार यावर्षी वैयक्तिक व संस्थांना देण्यात येणारी पुस्तकें पुस्तकपेढी विभागाचा कार्यक्रम आयोजित करून पुस्तकांचे वाटप करण्यात येईल.  

Institution Enrollment

  • फॉर्म भरल्यानंतर एकूण ७ डॉक्युमेंट्स bookbank@siddhivinayak.org ह्या ई-मेल आयडी वर पाठवावे


Institution Log in


1. For students of Class 11 and 12, sets of sequential books are provided twice a year to students of Class 13 to 15, according to the prescribed quantity. After students of Class 13 to 15 collect the first set, the books of the second session are given. The distribution of the second set of books is carried out only for those students who have complied with the required conditions.

2. From Class 11 to 15, students must complete the remaining registrations online between 9 June 2025 and 31 August 2025. Eligible students will be provided with books. From 1 September 2016 onwards, registration applications will not be accepted at the designated centers.

3. Applications from institutions and colleges will be accepted between 1 June and 30 September. After 1 October, proposals sent by institutions/colleges to obtain books will not be accepted.

4. Proposals received from institutions and colleges, once approved by the Trust Subcommittee under the Book Scheme, will make books available to those institutions and colleges. After books are received by the Trust from the distributor, the Book Department will organize a program for distribution. The Honorable Chairman has instructed that this year, books to be given to individuals and institutions will be distributed through such organized programs of the Book Department.

Student Enrollment Process
विद्यार्थी नावनोंदणी प्रक्रिया ( विद्यार्थी नोंदणी कालावधी जून ते ऑगस्ट )

The process is to apply online
  1. the subbmissition of the application this will be treated as online application
  2. Fee payment online - the refund will be done to the same UPI details as provided
  3. all the documents listed to be send to email : bookbank@siddhivinayak.org Click on more for detail steps
the application will be processed only after receving the documents over email.

Detailed steps ......more »


संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (अटी/निकष) ( संस्था नोंदणी कालावधी जून ते सप्टेंबर )


  1. शैक्षणिक संस्था ही सामाजिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असल्याबाबत प्रमाणपत्राची प्रत.
  2. संस्थेचे उद्दीष्ट शैक्षणिक असणे आवश्यक राहिल. त्यासाठी संस्थेचे बायलाँज (उपविधी ) प्रत जोडावी.
  3. संस्थेकडून प्रस्थापित / नियंत्रित शाळा / महाविद्यालय हे शासनमान्य असावे. या पृष्ट्यर्थ शासनमान्यता / शासननिर्णय याची प्रत जोडणे आवश्यक राहील.
  4. वाचनालय असलेल्या शाळा / महाविद्यालय यांना प्राधान्य देण्यात येईल.
  5. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक शाखा निहाय व इयत्ता निहाय ( कला, वाणिज्य, विज्ञान ११ वी ते १५ वी) यादी प्राचार्यानी प्रमाणित करून प्रस्तावासोबत पाठविणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नाव केशरी शिधापत्रिकेत समाविष्ट असले पाहिजे.
  6. विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व गरजू असल्याबाबत प्राचार्यांनी खातरजमा करून तसे प्रमाणपत्र स्वतःच्या स्वाक्षरीने देणे बंधनकारक असेल. अन्यथा पुस्तकपेढी योजनेतून पुस्तके वितरीत केली जाणार नाहीत. तसेच विद्यार्थ्याचे नाव केशरी शिधापत्रिकेत सामाविष्ट असले पाहिजे.
  7. मुख्याधापक / प्राचार्यांनी प्रमाणपत्रावर केलेल्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पँनकार्डाची व ओळखपत्राची छायांकीत प्रत स्वयं स्वाक्षांकित करून पाठवावी.
  8. संस्थेला एकदा पुस्तके दिल्यानंतर अभ्यासक्रम बदलल्याखेरीज पुढील ३ वर्षे पुस्तके वितरीत केली जाणार नाहीत. तथापि संस्थेची विद्यार्थी संख्या वाढल्यास सदर वाढीची शासन मान्यता / शासन निर्णयाच्या अधिन राहून वाढीव विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविण्यात येतील. तसेच दर वर्षी वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दि. १० जून पुर्वी विद्यार्थ्या कडून परत घेतलेल्या पुस्तकांचा इयत्ता निहाय व शाखा निहाय गोषवारा संबधित संस्थेने / महाविद्यालयाने न्यासास पाठविणे बंधनकारक आहे.
  9. प्राचार्य /मुख्याध्यापकांनी शाखा निहाय व इयत्ता निहाय आवश्यक असलेल्या पुस्तकांची लेखकांच्या नावासहित यादी सादर करून पुस्तकांची मागणी करावी. सदर यादी तपासून पुस्तकांचे वितरण न्यासाकडून केले जाईल.
  10. ज्या महाविद्यालयांना न्यासाकडून पुस्तके पुरविण्यात आली आहेत त्यांच्या पुस्तकांचे व अभिलेखांची न्यासाकडून संस्थेला भेट देऊन तपासणी करण्यात येऊ शकेल.

संस्थांसाठींचे निकष ......अधिक »